Unicamp Preloader

Marathi

Marathi

मराठी विभाग

           मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी  एक आहे. मराठी  महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे.      मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.

उद्दिष्टे

मराठी विभागाची स्थापना १९९०-९१ मध्ये झाली. मराठी विभाग खालील उद्दिष्टांसह तयार करण्यात आला आहे.

    • विद्यार्थ्यांमध्ये नैतिक, अध्यात्मिक लोकशाही मूल्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे.
    • विद्यार्थ्यांमध्ये भाषेची जाणीव करून देणे.
    • लिंगभेद, धार्मिक श्रद्धा आणि भाषा यांचा विचार न करता मानवतावादी भावनेला चालना देणे. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक कौशल्य विकसित करणे.
ध्येय
    • मराठी भाषा आणि साहित्य, वाडमय, व्याख्यान, चर्चासतत्र, कार्यशाळा यानद्वारे उत्तम नागरिक घडवणे.
धोरण
  • विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक जीवन आणि मराठी साहित्याविषयी जाण निर्माण करणे.
    • मराठीत उत्तम आणि गुणात्मक साहित्य उपलब्ध करून देणे.
    • विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती विकसित करणे.
अभ्यासक्रम